आटपाडी येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या ता.अध्यक्षा सुषमाताई मोटे याच्या नेतृत्वाखाली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती नालंदा बुद्ध विहार येथे जिल्हाध्यक्ष
राजेंद्र (बापू) खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या बोराडे मॅडम यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माता रमाई माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, अशा सर्व मातांना ज्यांनी महापुरुषांना घडवले यांच्या विषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रत्नमाला सावंत मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमास सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या इंजि.अनिता पाटील मॅडम यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले.
प्रमुख मान्यवरांनी सर्वच लहान मुलींना या सर्व मातांचा आदर्श घ्यावा असे सांगितले व ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांचे विचार आत्मसात करून शिक्षणामध्ये अग्रेसर असले पाहिजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी दिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे. त्यामुळे सर्वच महापुरुषांचे विचार घेऊन पुढे शिक्षण घेतले पाहिजे असेही यावेळी सर्वच मान्यवरांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पण मोठे यांनी केले व आभार प्रदर्शन सुषमा खरात यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी राजश्री मोटे मॅडम, रत्नमाला सावंत मॅडम, माया मोटे, ऐश्वर्या पवार, अश्विनी मोटे, अर्पणा मोटे, लतिका खरात पुनम ऐवळे कविता राजेंद्र खरात, सानिका खरात, शितल भिसे, वंदना भिसे, सुषमा खरात लक्ष्मी मोटे,निता सावंत, ऋतुजा काटे,निकीता विशाल काटे, कविता सुहास खरात,
सुरेश मोटे सर, नामदेव भीमराव खरात, समाधान खरात, महादेव खरात, संतोष सावंत,यांच्यासह नालंदा बुद्ध विहार येथील सर्व समाज बांधव लहान मुले विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचा नाश्ता व चहापाणी पूजा मोरे मॅडम यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केला आणि उर्वरित खर्च राजश्री मोठे मॅडम व सुष्मिता मोठे मॅडम यांनी केला
.