
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ५ मेंढ्यांचा मृत्यू झाला.यामध्ये मेंढपाळ काकासो खांडेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे, साधारणपणे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पुर्वअंदाज त्यांनी व्यक्त केला.
हिवतड येथील खांडेकरवस्ती येथे राहत असलेले काकासो खांडेकर हे पारंपरिक मेंढीपालन व्यवसाय करतात. काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या मेंढ्यांच्या पालावर अचानकपणे ३ ते ४ हिंस्र श्वापदाने हल्ला चढवला,यामध्ये त्यांची ५ मेंढरे मृत्युमुखी पडली. यापैकी २ मेंढ्याचे अवशेष सापडले असून बाकी बेपत्ता आहेत. यामुळे मेंढपाळ खांडेकर हवालदिल झाले आहेत.
ही घटना मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांना समजताच त्यांनी करगणीचे वनरक्षक सौ. शितल मांगले यांना संपर्क करत मेंढपाळ श्रीकांत खांडेकर यांच्या मेंढ्याचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी मेंढपाळ आर्मीचे प्रदेश प्रवक्ते दादासो वाक्षे, मेंढपाळ आर्मी आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, तालुका सचिव तुषार सोन्नुर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेंढपाळ आर्मीच्या पदाधिकारी यांनी मेंढपाळाला न्याय देण्याचे काम वनविभागाने करावे असे आवाहन केले.
“आटपाडी तालुक्यात मेंढ्यांवर होणारे हिंस्र श्वापदाचे वाढते हल्ले पाहता, मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आला आहे आणि यास “डबई कुरण” लांडग्यासाठी राखीव करून मेंढपाळांना संपविण्याचा घाट राजकीय टग्यांनी घातला आहे.तो आम्हाला मान्य नाही, संघर्ष अटळ आहे”
-भाई अंकुश मुढे
कार्याध्यक्ष मेंढपाळ आर्मी


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या