झरेत अपघात,दोघेजण गंभीर जखमी

देवदर्शन करून परत येताना अपघात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

झरे ता.आटपाडी येथे अशोक पवार व राजेंद्र वाघ रा. निमसोड ता. खटाव यांचा पंढरपूरवरून देवदर्शन करून परतीचा प्रवास करत असताना झरे ता.आटपाडी गावच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर अपघात झाला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.
जवळच असणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अनुसे यांना आवाज झाल्याने ते रस्त्याकडे पळत गेले, पाहतात तर दोघा दुचाकीस्वाराचा अपघात झालेला त्यांना दिसून आला. त्यानंतर लगेच त्यांनी 108 नंबरला फोन केला व वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध झाली. त्यानंतर त्या दोघा जखमींना उपचारासाठी दवाखान्यात देण्यात आले.
झरेच्या पूर्वेस एक किलोमीटरवर अनुसेवस्ती येथे एस आकाराचे वळण आहे.या वळणावर महिन्या-दोन महिन्याला अपघात होत असतात .याबाबत पीडब्ल्यूडी विभागाला अनेकवेळा कळवूनसुद्धा त्यांनी एस आकाराचे वळण काढण्याचा प्रयत्न केला नाही.
अचानक एस आकाराचे वळण असल्याने आणि कराड पंढरपूर महामार्ग असल्याने, महामार्गाचे काम चांगले झाल्याने सुसाट वेगाने वाहने जात असतात आणि असे अपघात होतात.
एस आकाराच्या वळणाच्या पूर्वेला व पश्चिमेला गतिरोधक घालण्याची गरज आहे. परंतु येथे गतिरोधक नसल्याने सतत अपघाताची मालिका सुरूच आहे. पीडब्ल्यूडी विभाग आणखी किती जणांचे जीव घेणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप अनुसे यांच्यामुळे पुढील अनर्थ टाळला. अपघाताचा आवाज होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व कोणताही विचार न करता त्या दोघांना बाहेर काढले व 108 ला फोन करून ॲम्बुलन्स व्यवस्था केली.