ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू

ऊसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू
चांदापुरी येथील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील तुषार खुर्द-पाटील (वय २१) या युवकाचा ऊसाने भरलेल्या ट्रालीखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की,५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आपला स्वतःच्या मालकीची यंत्रणा असणारी ऊसतोडणी मगरवाडी येथे सुरु होती.यावेळी ट्रॅक्टर भरुन आणत असताना उताराला उटी लावत असतानाच तुषारच्या अंगावरुन ट्राली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्युने चांदापुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिलीव परिसरातील ही दोन दिवसातील दुसरी घटना
या अगोदर बचेरीची श्रद्धा पाटील हिचा ट्रालीखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर लगेचच ही घटना घडली.