बचेरी येथील श्रध्दा पाटील हिच अपघाती निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील श्रध्दा रमेश पाटील (वय २१) हिचे अपघाती निधन झाले. श्रद्धा हिचे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डी फार्म शी शिक्षण झाले होते.शिक्षण झाल्या नंतर ती गेल्या काही दिवसापासून पिलीव येथील खरात मेडीकल मध्ये प्रॅक्टीस करीत होती.आज सकाळी नेहमीप्रमाणे ती मेडीकल मध्ये जाण्यासाठी बचेरीहुन मोटारसायकल वर वडिलांबरोबर निघाली होती. सकाळी ९ च्या सुमारास पिलीव येथील जाधव हास्पिटल जवळ आले असता समोरुन येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिली त्यावेळी पाठीमागुन येणाऱ्या टा्लीखाली श्रद्धा गेली असता तिला फरफरड नेले.यावेळी तिला मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा व रकतसत्राव झाला त्यानंतर ताबडतोब तिला पिलीव येथील खाजगी हॉस्पिटल डॉकटर गुळभिले यांच्या दवाखान्यात नेले मात्र सदर डॉक्टरांनी तिला अकलूज येथील दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला असता अकलुज येथील क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तिची प्राणज्योत रस्तयातच मालवली.या अपघातात श्रध्दांचे शरीर अक्षरशः चेंदामेंदा झाला ही घटना घडली असतानाच आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे जळलेल्या सांभाळलेल्या मुलीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला हे पाहताना वडील अक्षरशः व्याकुळ झाले .यामध्ये दोषी असणाऱ्यांना शिक्षा होईल ना होईल पण डि फार्म शी पर्यत शिक्षण पूर्ण करुन पुढील आयुष्याची स्वप्ने रंगणाऱ्या श्रद्धा हिला अपघातात आपला जिव गमवावा लागला. श्रद्धा हिचे अकलुज येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.त्यांनंतर तिच्यावर बचेरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.