प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील वलवण येथील संदीप तुकाराम जाधव या ३५ वर्षीय तरुणाने आज अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वलवण येथील संदीप तुकाराम जाधव याने आपल्या राहत्या घरी घरात कोणीही नसताना अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद गाव कामगार पोलीस पाटील सुहास सुरेश शिंदे यांनी आटपाडी पोलिसांमध्ये दिली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या