
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
खरसुंडी येथे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरु असताना सार्वजनिक कामात अटकाव आणण्याचा उद्देशाने ग्रामविकास अधिकाऱ्यास पाठीमागून पेन फेकून मारून उद्धट वर्तन केल्याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, खरसुंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरू होती. ग्रामसभेचे सार्वजनिक कामकाम सुरू असताना कामात अटकाव करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास अधिकारी शशिकांत बाबासो शिंदे यांना शेखर सोमनाथ मिसळ याने पाठीमागून पेन फेकून मारून त्यांच्याशी उद्धट वर्तन केले, अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुकळे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या