

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जतपासून 4 किलोमीटर अंतरावर शेगांव रोड लगत असणाऱ्या मानेवस्ती येथे घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून सतरा वर्षीय संतोष आबासाहेब माने (रा. मानेवस्ती, जत) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, जत शहरापासून 4 कि.मी. अंतरावर शेगांव रोडलगत माने वस्ती आहे. या ठिकाणी माने कुटुंबीय राहते. संतोष आपल्या घराच्या बांधकामावर मोटरच्या साह्याने पाणी मारत असताना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. वडील व शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
डॉक्टरांनी घटनेची माहिती जत पोलिस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिस पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संतोष हा कवठेमहांकाळ शहरातील आय. टी. आय. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षामध्ये शिकत होता. सुटीचे दरम्यान तो घरी आला होता. दरम्यान, ही दुखत घटना घडली. त्याच्या पश्चात आई – वडील व एक म भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या