

आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार का? आ.गोपीचंद पडळकर
आटपाडी येथे वीर सावरकर गौरव यात्रा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
काँग्रेस आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने सावरकर यांचा अपमान करत आहेत,महाराष्ट्र तो कधीही सहन करणार नाही,असा इशारा देत आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले,जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत मणीशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधान केलं, तेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये जोडा घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार आहेत का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी आटपाडी येथे केले.
आटपाडी येथे एसटी बस स्थानकापासून मुख्य बाजारपेठेतून नगरपंचायतमार्गे अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत आयोजित वीर सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते.
माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते अनिलशेठ पाटील, भाजपा नेते जयवंतराव सरगर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर,भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणभाऊ बालटे,मोहन रणदिवे व जनार्धन झिंबल, बाजार समितीचे संचालक विष्णुपंत अर्जुन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायणराव चवरे, दादासाहेब मरगळे व रुपेशकुमार पाटील, आबासाहेब पुजारी,अनिल सूर्यवंशी,यल्लाप्पा पवार,प्रणव गुरव,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात,भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर यात्रेच्या प्रारंभ बोलताना म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे योगदान दिलेले आहे, त्यामुळे आता त्याची स्वातंत्र्याच्या काळामध्ये फळे चाखत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो प्रखर राष्ट्रवादाचा विचार होता, तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या चुकीच्या रूढी, परंपरा होत्या, त्याला बाजूला सारून नवीन राष्ट्राच्या निर्मितीमधील सावरकर यांचे प्रचंड मोठे योगदान आहे.त्यांनी भोगलेल्या मरण यातना तरुणांसाठी आजही प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्र त्यांच्या विचारावर प्रचंड प्रेम करतोय. त्यांच्या विचारावर पुढे जाण्याची तरुण, युवकांची भूमिका आहे . जात निर्मूलनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.६०० मंदिरामध्ये सर्व समाजाला प्रवेश देण्याचे सावरकर यांच्या हातून मोठे कार्य घडले आहे.काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी जी भोगली,आज त्यातून अनेक तरुण मुले प्रेरणा घेत आहेत. परंतु काही वर्षभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करीत आहेत. मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सावरकर समजणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने सावरकर यांचा अपमान करत आहेत, महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रेचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आटपाडी येथे या यात्रेचे नियोजन केले आहे. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत मणीशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधान केलं, तेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये जोडा घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार आहेत का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आता फक्त काँग्रेस म्हणत आहे की, त्यांनी सावरकरांच्या बाबतीत बोलू नये, परंतु वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधी सावरकर यांचा अपमान करत आहे. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेले आहेत.विरोधाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.त्यामुळे मूळ हिंदुत्व आणि सावरकरांचे विचारसरणीपासून ते आता दुरावलेले आहेत.
सरकारने २०२४ चा अर्थसंकल्प मांडला. त्या अर्थसंकल्पामध्ये गावगाड्यापासून शहरापर्यंत सर्व घटकांचा, सर्व भागांचा समावेश केला. पहिल्यांदाच असा सर्वसामान्य लोकांचा विचार करणारा अर्थसंकल्प राज्य सरकारने मांडला. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय घेतले. एक रुपयांमध्ये विमा देणे ही पॉलिसी कुणीही आणली नव्हती. हे वारंवार महाविद्यास आघाडीवाले आंदोलन करत होते. त्यांना तो निर्णय करता आला नाही. एसटी महामंडळाने महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली. असे क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतले आहेत. गावगाड्यातील छोट्या छोट्या घटकांची महामंडळ निर्माण करणे, ओबीसी समाजासाठी १२ लाख घरकुलाची, भटक्या मुक्तासाठी २५ हजार घरे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमधून मंजूर करणे, धनगर समाजासाठी २५ हजार घरकुले मंजूर करणे, मराठा समाजासाठी निर्माण केलेली सारथी संस्था, त्याचं बळकटीकरण करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीची स्थापना करणे, बार्टी, आदिवासी समाज जमातीच्या योजना सरकार राबवत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवाले किती जरी एकत्रित आले, तरी गावगाड्यातील माणूस त्यांच्यापासून दुरावलेला आहे. सरकारच्या योजनांवर हा माणूस खुश आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने किसान सन्मान योजना चालू केली, त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो सन्मान योजना चालू केली. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आधार मिळतो आहे. देशाचा आणि महाराष्ट्राचा आधार शेतकरी आहे.महाविकास आघाडीने कितीही सभा घेतल्या तरी त्याचा काही परिणाम या सरकारवर होणार नाही आणि २०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवून सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये बोलताना ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे योगदान आहे, प्रखर राष्ट्रवाद, इंग्रजांच्या विरोधामध्ये पुकारलेले बंड आणि त्याची प्रेरणा घेऊन अखंड देशभर इंग्रजांच्या विरोधामध्ये उसळलेली लाट, आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आज देशातील व महाराष्ट्रातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या, राष्ट्रवादावर कायम आहेत.परंतु गेल्या वर्षभरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व राहुल गांधी हे वारंवार सावरकरजी यांचा अपमान करत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीची विधाने करीत आहेत. ज्या काळामध्ये मणीशंकर अय्यर यांनी सावरकर यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका केली होती, त्यावेळी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या हातामध्ये जोडे घेऊन मणीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोड्याने मारले होते. आता माझे आव्हान आहे, राहुल गांधी यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे मारणार का?
‘आम्ही काँग्रेसला समज देतोय, आम्ही काँग्रेसला ठणकावून सांगितलं’ आणि परत मांडीला मांडी लावून बसतोय, अशी भूमिका आहे. त्याचा निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यात्रेचे राज्यभर नियोजन केले आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आटपाडी तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. भाई शिवराम मासाळ,लिंगीवरेचे माजी सरपंच आगतराव खांडेकर,शंकरराव मदने,नरेंद्र दिक्षीत,पांडुरंग झंजे,आदी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक