

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
आईचं दूध पिताना श्वसननलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कवठे,ता.कराड येथे घडली.
याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती कृष्णत यादव(रा.कवठे) यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या. त्यावेळी मुलीच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला आणि तिला उलटी झाल्याने ती बेशुद्ध पडली. अडीच महिन्यांच्या चिमुकलीला घरातल्यांनी तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने यादव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव डोंगरे हे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती