उद्या आटपाडी बंदची हाक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

जादूटोणा करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या(?)संदर्भात उद्या 25 डिसेंबर रोजी आटपाडी शहर बंद ठेवण्याचे हाक देण्यात आली आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी आटपाडीतील एका हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्याने जादूटोणा करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न केला, त्या संदर्भात आटपाडीमधील सुजाण नागरिक व व्यापारी संघटना या सर्वांनी निषेध मांडून आटपाडी शहर उद्या 25 डिसेंबर रोजी एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता कल्लेश्वर मंदिर येथे महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे अशा स्वरूपाचे सह्यांचे पत्र आटपाडी पोलिसांना देण्यात आले आहे. त्यावर गौतम सोहनी, अशोक माळी, सुजित भोसले आदींच्या सह्या आहेत.