

स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून उचलले टोकाचे पाऊल
सेनगाव पोलिसात आकस्मित मृत्यूचा गुन्हा नोंद
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
हिंगोली
सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील नवल जयराम नाईकवाल याने साई मंदिराच्या परिसरात झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी घडली.
नवल जयराम नाईकवाल (वय २८ वर्षे) याने संध्याकाळी रात्री उशिरा फाशी घेतल्याने सेनगाव परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, अमलदार सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक उचित मुपडे, जाधव भारती, या पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे हलविण्यात आले. सदर घटनेचा तपास सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या