विषारी औषध पिल्याने एकाचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

चोरे ता.कराड येथील दत्तात्रय प्रल्हाद यादव (वय ४५) यांचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उंब्रज येथील शारदा क्लिनिक येथे घडली.
याबाबत गणेश नथुराम यादव (रा.चोरे) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमृत आळंदे करत आहेत.