

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील खलाटी येथील माजी सैनिक व माजी ग्रामपंचायत सदस्य आबा तात्योबा देवकते (वय 76) यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस (सी.आर.पी.एफ) गिरीधर देवकते यांचे वडील होत.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जनांचा कार्यक्रम शनिवारी सकाळी आठ वाजता खलाटी येथे होणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती