म्हसवड शहरात यात्रेनिमित्त शुभेच्छा फ्लेक्स लावण्यास बंदी, कारवाईचा इशारा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

म्हसवड शहरात होत असलेल्या सिध्दनाथ यात्रेच्या निमित्त शहरात कोणीही शुभेच्छा फ्लेक्स लावु नये असे आवाहन म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे, यात्रनिमित्त शहरात जर कोणी फ्लेक्स लावले तर ते जप्त केले जातील व संबधीतांवर शहर विद्यपीकरणाचा गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सिध्दनाथ यात्रा यंदा फ्लेक्स मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असुन त्यासाठी पालिका हद्दीत सार्वजनिक जागेत कोणालाही फ्लेक्ससाठी परवाना देण्यात आलेला नाही फ्लेक्समुळे शहराला विद्रुपीकरण प्राप्त होत असल्याने यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी पालिकेच्या वतीने शहरातील सर्व फ्लेक्समेकर्सना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. यंदाची ही सिध्दनाथ यात्रा शांततेत, सुरळीत व फ्लेक्स मुक्त करण्यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत असुन नागरीकांनीही यासाठी प्रयत्नाचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.