

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील मापटेमळा येथील दिपक चंद्रकांत पिसे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मापटेमळा ता. आटपाडी जि. सांगली येथील दिपक चंद्रकांत पिसे (वय २१) याने राहत्या घरामध्ये आज दुपारी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे नातेवाईक सिद्धेश्वर चंद्रकांत पिसे यांनी मयत अवस्थेत आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबतची वर्दी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अस्मा पट्टवेगार यांनी फोनवरून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली. प्राथमिक तपास व पुढील चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक माने, पोलीस शिपाई पांढरे यांना रवाना करण्यात आले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती