


मंगलमूर्ती मोबाईल शॉपीमध्ये खरेदी केलेल्या ग्राहकाला लकी ड्रॉ मध्ये मोबाईल खरेदीवर मिळाले वॉशिंग मशीन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे बजाज फायनान्सच्या वतीने व माऊली वाघमोरे यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भव्य लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्राहकांना खरेदीवर दररोज 50 हजार रुपयांचा बक्षिसांचा धमाका ठेवण्यात आला होता. आजच्या लकी ड्रॉ मध्ये मंगलमूर्ती मोबाईल शॉपीमध्ये खरेदी केलेल्या पिंपरी येथील रोहित सत्यवान सोनटक्के या ग्राहकाला १८,५०० रुपयाच्या मोबाईल खरेदीवर वॉशिंग मशीन मिळाले आहे.
लकी ड्रॉ कुपनद्वारे दररोज सोडत केली जात होती.
संयोजक माऊली वाघमोरे,मंगलमूर्ती मोबाईल शॉपीचे मालक दिपक भागवत व सागर भागवत, मनोज नांगरे-पाटील, नितीन कदम, साहिल मोरे, प्रेम मोरे, सुरज सूर्यवंशी,निलेश मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वॉशिंग मशीन प्रदान करण्यात आले. मंगलमूर्ती मोबाईल शॉपीमध्ये आटपाडी स्टॅन्डनजीक असलेल्या शॉपीमध्ये बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती