


रोज लकी ड्रॉ कुपन,माऊली शॉपीमधील ग्राहकाला फ्रीज खरेदीवर एलइडी टी.व्ही,साई मोबाईल शॉपीमधील ग्राहकास मोबाईल खरेदीवर फ्रिज
लोन मेळाव्यात दररोज 50 हजार रुपये पर्यंतचे बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे बजाज फायनान्सच्या वतीने व माऊली वाघमोरे यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत भव्य लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना खरेदीवर दररोज 50 हजार रुपयांचा बक्षिसांचा धमाका ठेवण्यात आला आहे. आजच्या लकी ड्रॉ मध्ये शाहरुख पठाण यांना फ्रिज खरेदीवर एलईडी टीव्ही प्राप्त झाला आहे.साई मोबाईल शॉपी यांच्यात खरेदी केलेल्या पोपट नाथा चव्हाण या ग्राहकास काल मोबाईल खरेदीवर लकी ड्रॉ मध्ये फ्रिज मिळाला. मेळावा सुरू आहे तोपर्यंत लकी ड्रॉ कुपनद्वारे दररोज अशीच सोडत केली जाणार आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता मेळाव्याचे दिवस वाढवण्याची शक्यता आहे. सर्वांनी बजाज फायनान्सच्या या भव्य लोन मेळाव्याचा लाभ घेऊन ‘एक रुपयात, वस्तू घरात’ घेऊन जाण्यासाठी बचत भवन, आटपाडी येथे विविध स्टॉल्सला भेट देण्याचे आवाहन संयोजक माऊली वाघमोरे यांनी केले आहे.
आटपाडी बचत भवन शेजारी सुरू असलेला या भव्य लोन मेळाव्यामध्ये मोबाईल, दुचाकी, घरगुती उपकरणे, तसेच अन्य सोयी सुविधांच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यावर लकी ड्रॉ कुपन मिळत असून त्याची दररोज सोडत केली जात आहे. दररोज 50 हजार रुपयांच बक्षीसे देण्यात येत आहेत.
आज माऊली शॉपी यांच्यात खरेदी केलेल्या भिंगेवाडी येथील शाहरुख पठाण या ग्राहकास फ्रीज खरेदीवर लकी ड्रॉ मध्ये एलईडी मिळाला आहे. संयोजक माऊली वाघमोरे, व माऊली शॉपीचे मालक सुनिल पवार व मनोज नांगरे, एरिया मॅनेजर करीम शेख व ब्रांच मॅनेजर सुरज सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.काल साई मोबाईल शॉपी यांच्यात खरेदी केलेल्या पोपट नाथा चव्हाण या ग्राहकास मोबाईल खरेदीवर लकी ड्रॉ मध्ये फ्रिज मिळाला. संयोजक व दुकानदार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती