घेताना लाच, सर्कल कॅच!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना पुसेसावळीचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.वडिलांच्या नावाचा फेरफार नोंद फायनल करण्यासाठी लाच मागितली होती. लाच स्वीकारताना एसीबीने त्यास रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाचा फेरफार नोंद फायनल करण्यासाठी पुसेसावळी मंडल अधिकारी धनंजय मधुकर भोसले रा. काशीळ यांने तक्रारदाराकडे १०००/- रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान,याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे, सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर यांनी सापळा रचून तक्रारदाराकडून १०००/- रुपयांची लाच स्वीकारताना धनंजय भोसले यास रंगेहाथ पकडले. मंगळवारी एसीबीने ही कारवाई केली.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे,सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर व पथकाने केली .