माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे
गोकुळ अष्टमीला सर्व मंदिर खुले करून कीर्तन, भजनाला परवानगी मिळणे बाबत नायब तहसिलदार एन .डी .काळे यांना निवेदन देताना बाजीराव केंगार , एन . आर . बनसोडे , ह.भ.प. संजय हुलगे माळशिरस तालुका शहर अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ , सदस्य वैभव गोरड , राहुल गोरड , संकेत थोरात सह अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले .
रमजानला परवानगी मिळते तर गोकुळ अष्टमी साठी कीर्तन, भजनाला परवानगी का नाही. वारकरी परंपरेमध्ये गोकुळ अष्टमीला खूप मोठे महत्व असून ती निष्ठेने साजरी केली जाते. वारकरी भाविकांनी चैत्र वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी हे सर्व उत्सव घरात राहून साजरे केले. महामारी कोरोना मुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. आंदोलन ही केले नाही, सहकार्यच केले.रमजान साजरा करणेसाठी परवानगी मिळते. बकरे कापण्यासाठी मंत्रालयात चर्चा, बैठका होतात. तर गोकुळ अष्टमीचा साधा विचार ही केला जात नाही. त्यासाठी निवेदन देऊन शासनाला जागे करावे लागते. हेच दुर्दैव आहे. गोकुळ अष्टमी हा परंपरेने केला जाणारा उत्सव आहे. प्रत्येक गावात हा कार्यक्रम केला जातो. ही अष्टमी नित्य नेमाने साजरी करणेसाठी लवकरात लवकर निर्णय करून जाहीर करावा.
तसेच सध्या बाजार पेठे सहित सर्व खुले केले आहे. त्यामुळे येणाऱ्या गोकुळ अष्टमीला दि.05 – 08- 2020 ते 13 -08 – 2020 आठ दिवस सप्ताह, नित्यनेम करणेसाठी गावा गावातील सर्व मंदिर खुले करून कीर्तन,भजन करणेसाठी नियम अटी घालून परवानगी जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना भाविक वारकरी मंडळ यांचे कडून सर्व पदाधिकारी यांनी दिले आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद