मिडिया असोसिएशन दिल्लीच्या वतीने उद्योजक सुभाष सातपूते सन्मानित

मोहनराव पुजारी/ आटपाडी,(प्रतिनिधी ):

फिल्म आणि टीवी मीडिया असोसिएशन नवी दिल्लीच्या वतीने कोरोणा वारीयर्स या सन्मानाने सुभाष सातपुते अँड कंपनीचे चेअरमन  व भरारी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सातपुते यांचा गौरव करण्यात आला आहे.
           असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लियाकत अली खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिव विनायक शर्मा आणि राष्ट्रीय महासचिव दिव्याजी यांच्या समितीने सुभाष सातपुतेंची सन्माननीय निवड केली . मोठ्या समारंभात त्यांना गौरविण्याचा मानस या पदाधिकाऱ्यांनी कळविला आहे.
        मुळचे आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचे असणारे सुभाष सातपुतेनी भरारी ग्रुपच्या माध्यमातून कोरोना काळात आटपाड़ी तालुक्यात अडकलेल्या परप्रांतिय हैद्राबाद येथील 50 कुटुंबांना व राजस्थान येथील जडीबुटीचा व्यवसाय करणारा 65 लोकाना NUJM च्या सहकार्याने   एक महिना पुरेल इतकं जीवनावशक वस्तूंच्या कीटचे वाटप केले. रक्ताची कमतरता राज्यात भासू लागल्याची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यानी रक्तदानाचे आव्हान करताच शासकीय ब्लड़ बँकला सोबत घेवून   दोनदा रक्तदान शिबिर आयोजित करुन 303 रक्त पिशव्या त्वरित  दिल्या.

स्वत:च वाढदिवस कोरोना काळ असताना  अनाथाची माई सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना मदत करुन व 31 व्या वाढदिवसानिमित्त 31 हजाराची मदत करुन साधेपणाने साजरा केला.त्याचबरोबर पुणे येथील गरीब, गरजू व परप्रांतिय 1000 कुटंबाना एक सामाजिक बांधिलकी या नात्याने एक महिना पुरेल इतकं जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे  वाटप त्याचबरोबर लग्नाच्या दुसरा वाढदिवसा निमित मुंबईतील पनवेल महानगरपालिकेला 1000 मास्क देऊन साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. गरीब व गरजू लोकाना 9000 मास्क व 2000 लिटर सेनिटाइज़र  मोफत देऊन  विविध सामाजीक कार्यात मोठी गरुड भरारी मारली आहे.

त्यांच्या सर्वस्पर्शी कार्याचा राज्यात गौरव झाला आहे . कोरोणा महामारीच्या संकटावेळी शेकडो कुटुंबाना मदतीचा हात देणारे , विविध मार्गाने कोरोणा संकटात सर्वांपरी आपूलकी, श्रद्धा ,सद्भावना दाखविणाऱ्या सुभाष सातपुतेंचा राज्यस्तरावर गौरव होवू लागला आहेच त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या असोशिएशनने सुभाष यांच्या चौफेर कार्याची दखल घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .