आटपाडीनजीक अपघातात इटकी येथील एक ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडीनजीक शेरेवाडी पाटीजवळ ट्रॅक्टरला पाठीमागून आईसरने धडक देऊन झालेल्या अपघातात इटकी येथील पोपट श्रीमंत सावंत (वय ५० वर्षे) हे जागीच ठार झाले.
अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील इटकी येथील पोपट श्रीमंत सावंत हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इटकी येथून कोल्हापूरकडे ट्रॅक्टरसाठी ट्रॉली आणण्याकरिता निघाले होते. आटपाडीनजीक शेरेवाडीपाटीजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या आईसर टेम्पोने त्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.त्यामध्ये ते जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच इटकी व राजेवाडी येथील त्यांचे नातेवाईक तातडीने आटपाडीला आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय,आटपाडी येथे आणण्यात आला आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.