प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
बळीराजा फौंडेशन व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जांभुळणी ता.आटपाडी येथे पिक व पाणी व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरो प्रतिनिधी तथा माण खटावचे कार्यकुशल माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, सरपंच सौ.संगिता मासाळ, मंडल कृषी अधिकारी खरसुंडी एस.व्ही.लोखंडे, पानी फौंडेशनचे आटपाडी तालूका समन्वयक सुहास पाटील, घाणंदचे उपसरपंच उमेश ढगे, घाणंदचे माजी सरपंच पांडूरंग कटरे,कुंडलीक कटरे, जांभुळणीचे माजी चेअरमन तथा बळीराजा फौंडेशनचे संचालक महादेव मासाळ, कृषी साहाय्यक एस.बी.काळेल,संचालक सलीम मुलाणी, सुनिल जाधव, पांडूरंग झंजे, यशवंत माळी, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद झंजे, कोरो प्रतिनिधी डाॅ.विक्रम गायकवाड,पंढरीनाथ गुरव,सौ.लक्ष्मी घागरे या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच प्रल्हाद माने यांनी केले. प्रास्ताविक भाई शिवराम मासाळ यांनी केले. सुहास पाटील यांनी पिक व पाणी व्यवस्थापन ह्या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.कृषी सहायक एस.बी.काळेल यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब रणपिसे यांनी पाण्याची गरज व पाणी गावातल्या गावात कसे थांबवायचे ह्याचे मार्गदर्शन करताना, अध्यक्षीय भाषणाची उंची काय असते ते त्यांनी दाखवून दिल्याने कार्यक्रमांसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्यात कुजबुज होती.
कार्यक्रमाचे नियोजन समाधान झंजे, सुहास मासाळ, दिनेश घागरे, संजय कदम,अरविंद पाटील, सुनिल मासाळ,यांनी केले. सौ.लक्ष्मी घागरे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती