

एकाचा मृत्यू,तीनजण गंभीररित्या भाजले
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उरण
उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने एका ज्युनियर इंजिनिअरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईत नेण्यात आले आहे.उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.
आज रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते.दुपारी 12 ते 12:30 च्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु असताना बॉयलरमधील दाब अचानकपणे वाढला. त्यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंम्प सदरचा दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला. स्फोटाचा आवाज जबरदस्त होता.
मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असतानाही संबधित खात्याकडून तपासणी करून दाखला घेतला गेला नव्हता, अशी माहिती उघड झाली आहे.
या ठिकाणी काम करीत असलेले ज्युनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी),विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारानंतर त्याना अधिक उपचारासाठी दोघांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.उपचारादरम्यान ज्युनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे. या स्फ़ोटाबाबत अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या