डोंबाळवाडी डाळिंबाच्या बागेत सापडली गांजाची झाडे!

माळशिरस पोलिसांची कारवाई,एकाच अटक
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी येथे डाळिंबाच्या बागेत छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेसहा किलो गांजाची हिरवी ओली सहा झाडे आढळून आले आहेत. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये गणपत शिवाजी जाधव (वय ७२,रा.डोंबाळवाडी, खुडुस ता. माळशिरस जि. सोलापुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माळशिरस पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड मौजे डोंबाळवाडी येथील एका व्यक्तीच्या शेतामध्ये गांज्याच्या झाडाची लागवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळाली. यावरून त्यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके पोलीस उपनिरीक्षक पुजारी, सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत जरे, पोलीस हवालदार घोगरे, नवनाथ सोनटक्के, पोलीस नाईक स्वप्नील गायकवाड, राहुल रुपनवर, हवालदार सोमनाथ माने,माने यांच्या पथकाने डोंबाळवाडी येथील गणपत शिवाजी जाधव (रा.डोंबाळवाडी, खुडुस ता. माळशिरस जि. सोलापुर) यांच्या शेतातील डाळिंबाच्या बागेमध्ये छापा टाकला. या कारवाईमध्ये ६ किलो ४६९ ग्रॅम वजनाची ९७ हजार ३५ रुपये किमतीची हिरवा पाला, बोंडे, फांद्या, खोड, मुळे असलेली गांजाची हिरवी ओली सहा झाडे आढळली. या छाप्याची कायदेशीर कारवाई करुन गांज्याच्या झाडाबाबत माळशिरस पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला. गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार हनुमंत दत्तात्रय जरे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन हा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. गणपत शिवाजी जाधव यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घेळकर करीत आहेत.