नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा ३२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
विविध मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी शाखेचे व्यवस्थापक विश्वजीत देशमुख यांनी शाखेच्या प्रगतीचा चढता आलेख वाचून दाखविला. शाखेचा आर्थिक व्यवहार हा महिलांच्या सहभागामुळे उंचावला आहे. याबद्दल त्यांनी प्रथम महिलांचे आभार मानले.महिला या चूल आणि मूल व आपल्या संसाराचा गाडा सांभाळून आर्थिक क्षेत्रात कशाप्रकारे आपल्या संसारास मदत करतात व या आर्थिक व्यवहारामुळे या महिलांना समाजात कसे वावरायचे याचे ज्ञान प्राप्त होते, याची सखोलपणे माहिती दिली.
ग.दि.मा.हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक देवानंद नांगरे यांनी शाखेच्या कामकाजात अधिकारी वर्गाची ग्राहकांना कशी साथ असते, यावर शाखेची प्रगती अवलंबून असते.या शाखेच्या अधिकारी वर्गाच्या कार्यामुळे व ग्राहकांना त्यांनी दिलेल्या सेवेमुळे ही शाखा आज तालुक्यात पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांनी कर्मचारी वर्गाचे विशेष अभिनंदन केले.
बँक सी.आर.पी.सौ.अनिता वाघमारे यांनी बँकेच्या व्यवहारात महिलांचा सहभाग या विषयावर फार मोलाची माहिती सांगितली.सौ. रेश्मा गुरव यांनी आभार मानले.
यावेळी तालुका विभागीय अधिकारी व्ही.व्ही.पाटील तासगाव, रमेश पाटील- फिल्ड ऑफिसर ,आर.जे.शिंदे, संजय पाटील, मनेर मुलाणी तसेच बँक सखी सौ.मनीषा विभुते, ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय विभुते, तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहनराव विभुते, वसंतराव पाटील, गुलाबराव माडगूळकर, माजी चेअरमन दगडू लिंगडे, वसंतराव विभुते, प्रशांत विभुते, महादेव मंडले, माजी सरपंच विठ्ठल गवळी ,बजरंग वाघमारे, गोपाळकृष्ण दीक्षित, माजी सरपंच सौ.पल्लवी विभुते ,पल्लवी प्रसाद विभुते, सौ.रंजना विभुते व इतर महिला, ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद