प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जालना
कवठेमहांकाळ जि.सांगली येथील धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बिरोबा बनात आरेवाडी येथे दि. २ ऑक्टोबर रोजी रविवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यास जालना जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित रहावे.
या दसरा मेळावाप्रसंगी बहुजन ह्रदयसम्राट लोकप्रिय लोकनेते आ.गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील बहुजनांना,वंचितांना,विस्थापितांना,भटक्याना, अन्यायग्रस्तांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, मेंढपाळांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याकरिता आमदार गोपीचंद पडळकर अविरत संघर्ष करत आहे.
आ.पडळकर यांची विचारधारा गाव गाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता या दसरा मेळाव्याप्रसंगी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारद्वारे केले आहे.
राज्यभरातील भटक्या,वंचित,विस्थापित, बहुजन समाजातील लोकांच्या प्रश्नांवर विचारमंथन करून त्या प्रश्नांची शासनाला जाग आणून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आरेवाडी येथील बिरोबा बनात दसरा मेळावा भरवण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांत कोरोनामुळे हा दसरा मेळावा झाला नाही. यंदापासून पुन्हा हा मेळावा भरवण्याचे श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे. येत्या रविवारी हा दसरा मेळावा होणार आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद