आटपाडी येथे उद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये बुधवार दि.२८ रोजी सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चंडवले यांनी दिली.
सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सेवा पंधरवडा विशेष मोहीम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर विशेष मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
आटपाडी तालुक्यात बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबीर मोफत असून तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले यांनी केले आहे.