भाजपा महिला आघाडी कार्याध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने यांचे आवाहन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
लोकनेते,बहूजननेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ येथील धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री.बिरोबा बनात होणाऱ्या दसरा मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जत तालुका भाजपा महिला आघाडी कार्याध्यक्ष तेजस्विनी व्हनमाने यांनी केले आहे.
दसरा मेळाव्यास मल्हार सेनेचे पदाधिकारी रिंकू केशवे, प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे, विदर्भ पदाधिकारी अरुण वैतकार आदी संघटना व पदाधिकारी मार्फत पाठिंबा देण्यात आला आहे. तरी गोपीचंदजी पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्यास बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित राहून समाजाच्या प्रभोधनसाठी समाजाच्या आगामी मागण्या इत्यादी वर विशेष सभा अंतर्गत मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी सौ. व्हनमाने यांच्या वतीने करण्यात आले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती