
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील रहिवाशी असणाऱ्या महिलांसाठी माडगुळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष व ग्रामपंचायतचे सदस्य अमोल (शेठ) विभुते यांनी गौराई सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
माडगुळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष अमोलशेठ विभुते यांच्यामार्फत वर्षभरात गावात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील महिलांनी गौराईचा सण हा उत्साहात साजरा करावा, यासाठी गौराई सजावट स्पर्धा आयोजित केली होती.आपल्याच गावातील जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत भाग घ्यावा,पारंपारिक चालीरीती मोडून नवीन युगाप्रमाणे त्यांनी जगावे,चुल आणि मुल एवढेच आपले जग न मानता त्यानी समाजात पुढे येऊन ताटमानेने जगावे, आपण शिकून वेगवेगळ्या पदांवर काम करावे, आपले घर उच्च शिक्षित बनवावे, हेच एक उद्दिष्ट या महिलांसाठी स्पर्धा आयोजन करण्यापाठीमागे आहे. हे ओळखून त्यानी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
गावातील १५ महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.त्यात सौ.पल्लवी पवनकुमार विभुते,सौ. शितल सचिन विभुते,सौ.संगिता सुभाष विभुते,सौ.संगिता शिवाजी रेड्डी, सौ.संगिता विठ्ठल गवळी, सौ.रेश्मा प्रसाद गुरव,सौ.ऐश्वर्या रुपेशकुमार गुळीग, सौ.ज्योती अरुण कुलकर्णी,सौ.जयश्री प्रमोद विभुते, सौ.सुवर्णा भाऊसो लिंगडे, कु.शितल सुरेश राक्षे, सौ.पल्लवी तानाजी लिंगडे, सौ.स्वाती सचिन कंडरे, सौ.विद्या वैभव विभुते, सौ.ललिता बाळासाहेब विभुते या महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.यामधून या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक निवडले आहेत. उत्तेजनार्थ क्रमांकही देण्यात आले आहेत.ते पुढीलप्रमाणे-
१) सौ.रेश्मा प्रसाद गुरव
व सौ.ऐश्वर्या रुपेशकुमार गुळीक
२) सौ.जयश्री प्रमोद विभुते
३) सौ.सुवर्णा भाऊसो लिंगडे
व सौ.संगिता सुभाष विभुते
-:उत्तेजनार्थ :-
१) सौ.पल्लवी तानाजी लिंगडे
२) सौ.शितल सचिन विभुते
३) सौ.विद्या वैभव विभुते
४) सौ.पल्लवी पवनकुमार विभुते
या स्पर्धेसाठी दै.’प्रगल्भनायक’चे संपादक लक्ष्मणराव खटके, सम्यक-जीवन फिल्म्स अँड म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचे संस्थापक सचिन वाघमारे यांनी या स्पर्धेतील प्रत्येक सजावटदृश्य भेट देऊन परीक्षण केले. तसेच गायक नरेंद्र दिक्षीत,बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार कवी अरविंद चांडवले, संपादक पी.एस.पांढरे यांच्यामार्फत या स्पर्धेचे डिजीटल परीक्षण झाले.
प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकाला दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्राप्त प्राप्त स्पर्धकाला एक हजार पाचशे रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाला एक हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकाला पाचशे रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती