दरोड्यातील सराईत दरोडेखोरांच्या २४ तासात आवळल्या मुसक्या!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोपरगाव
कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील संवत्सर-नऊचारी शिवारात गुरुवारी दि.१५ संप्टेबर २०२२ च्या मध्यरात्री ०६ ते ०७ जणांच्या एका टोळक्याने अनिल सोनवणे यांच्या घरावर दरोडा टाकत अनिल हरीभाऊ सोनवणे वय ५४, आई सुगंधाबाई हरीभाऊ सोनवणे वय ७८ वर्षे, भावजई सुनिता बबन सोनवणे वय ५२ वर्षे सर्व (रा. नऊचारी- संवत्सर, शिवार ता. कोपरगाव) या व्यक्तींना गजाने, चाकुने, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन घरातील २,८१,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने
व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून
घेऊन पसार झाले होते.
याबाबत कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं २८७ / २०२२ भादविक. ३९५,३९७ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचे तपासाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानीक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि.गणेश इंगळे, सपोनि.दिनकर मुंडे, पोसई.सोपान गोरे,सफौ. बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, योगेश घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, पोना.शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ.रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, चा.पोहेकॉ.संभाजी कोतकर, बबन बेरड, अर्जुन बडे,चा.पोकों.भरत बुधवंत यांनी वारी, सावळीविहीर, रुई गावाचे शिवारात (ता. कोपरगाव) संशयीत आरोपींची माहिती घेत असतांना पो.नि.अनिल कटके, यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी नामे दिलीप विकास भोसले रा. कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. कोपरगाव याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केला आहे.अशी खात्रीशीर
माहिती मिळाल्याने त्यांनी पथकासह आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून कारवाडी शिवार, कोकमठाण, ता.कोपरगाव येथे सापळा लावला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सदर ठिकाणी असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच काही लोक पळून जाऊ लागले. त्यावेळी पथकातील पोलीस
अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने कारवाडी शिवारातून दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा. कारवाडी, कोकमठाण, ता. कोपरगाव तसेच अनिल अरुण बोबडे रा.वेस, ता. राहाता व राहुल दामू भोसले रा.जेऊर पाटोदा, ता.कोपरगाव यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी विरोधात विविध जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.आरोपी दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा.कारवाडी कोकमठाण तालुका कोपरगाव याच्यावर दोन पोलीस स्टेशनला १ दरोड्याचा व १ खुनाचा गुन्हा दाखल आहे तर दुसरा आरोपी अनिल अरुण बोबडे रा.वेस तालुका राहाता याच्यावर खडकी (पुणे) -१ स्वारगेट (पुणे) -२ भांडुप (ठाणे)-१ मुंलुड (ठाणे) -१ बांद्रा (अंधेरी)-३ बंडगार्डन (पुणे) -८ फरासखाना ( पुणे) -१ अशे १७ जबरी चोरी, दरोड्याची तयारी व इतर या सारखे गंभीर स्वरुपाचे १७ गुन्हे दाखल आहेत तर तिसरा आरोपी राहुल दामू भोसले रा.जेऊर पाटोदा तालुका कोपरगाव याच्यावर लोणी (राहाता) येथे – १ व गंगापूर (औरंगाबाद) येथे – १ असे २ गुन्हे दाखल झालेले आहेत हे तिनही सराईत असे आरोपी असुन त्यांचे इतर ४ साथीदारांचा शोध सध्या सुरू असल्याचे लवकरच इतर फरार आरोंपीना अटक करण्यात येईल असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी म्हटले आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही करुन ताब्यात घेतले असुन पुढील चौकशी साठी कोपरगाव शहर पोलिसांकडे जमा केले आहे.