घोषणा देत सरकारचा केला निषेध,सुधागड तालुका युवासेना आक्रमक
एक लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला घालविणाऱ्या राज्य सरकारचा युवासैनिकांनी केला निषेध !शेकडो तरुणांचा निषेध स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे
वेदांत आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला आणि त्यामुळे 1 लाख तरुणांचा रोजगार देखील गेला. या गंभीरबाबी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात युवासेने तर्फे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा व निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. पाली सुधागड तालुक्यात देखील युवासेना रायगड जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे व युवासेना रायगड जिल्हा अधिकारी सचिन डोबले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना सुधागड तालुका अधिकारी किरण पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली सुधागड पाली येथे शेकडो युवासैनिक शिवसैनिक व तरुणांनी एकत्र येऊन 1 लाख तरुणांचा रोजगार गुजरातला घालविणाऱ्या राज्य सरकारचा निषेध केला. निषेधार्थ राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सुधागड पाली तहसील कार्यालय पर्यंत जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाली नायब तहसीलदार वैशाली काकडे यांच्याकडे त्या संदर्भातील निवेदन दिले. यावेळी युवासैनिकांनी ” 50 खोके राज्य सरकार ओके आणि महाराष्ट्राला धोके” अश्या राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत, तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, माजी सभापती रमेश सुतार, महिला आघाडीच्या अश्विनी रुईकर, विभाग प्रमुख किशोर दिघे, शिवसेना शहर प्रमुख ओमकार खोडागळे, युवासेना पाली शहर अधिकारी निखिल खामकर, युवासेना पाली सरचिटणीस यश हजारे, ज्येष्ठ शिवसैनिक अर्जुन हुले, रोहन राऊत, विद्देश आचार्य, कुंभारशेत उपसरपंच किशोर खरीवले, मिलिंद शेळके,सोहम खोडागळे, अक्षय खोडागळे, मयूर देशमुख, तुषार ठोंबरे, सागर वाघमारे, जितू दळवी आदींसह शेकडो युवासैनिक शिवसैनिक व तरुण उपस्थित होते.
वेदांत आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्तरीत्या महाराष्ट्रात येऊ घातलेल्या सेमी कंडक्टर निर्मितीचा सुमारे पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरात मध्ये गेला यामुळे महाराष्ट्रातील सुमारे एक लाख तरुणांचा रोजगार गेला याशिवाय राज्यात मोठा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असती राज्याला जीएसटीच्या माध्यमातून मोठा महसूल मिळाला असता त्याचा राज्याच्या विकासाला उपयोग झाला असता यामुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्याच्या हिताचा प्रकल्प परराज्यात जाऊ दिल्याबद्दल राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करत शासनाने त्वरित याची दखल घेऊन सदर प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येईल असा प्रयत्न करावा अन्यथा या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन करू असे युवासैनिकानी निवेदन शासनाला दिले आहे.
“या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे 1 लाख तरुणांचा रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेला आणि त्यामुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लवकरात लवकर याची दखल घेऊन तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू” – किरण पिंपळे,युवासेना, सुधागड तालुका अधिकारी

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या