आ.पडळकर व आ.लोणीकर यांची आग्रही मागणी यशस्वी – बाबा आटोळे

ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना परराज्यात जाऊन शिक्षण घेण्याकरिता मिळत असलेली शिष्यवृत्ती योजना पुन्हा चालू
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जालना
महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब आणि बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना पर राज्यात जाऊन शिक्षण घेण्याकरिता मिळत असलेली शिष्यवृत्ती योजना चालू करण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील परराज्यात शासन मान्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१७-१८ पासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यावर ऑफलाईन पध्दतीने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
त्यामुळे ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असल्याने आम्ही समाधानी आहोत महाराष्ट्र सरकारचे आणी या करीता विशेष आग्रही मागणी करणारे आ. बबनराव लोणीकर, आ. गोपीचंद पडळकर यांचे आम्ही आभार मानतो. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे जालना जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आटोळे यांनी म्हटले आहे.