प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोपरगाव
राहता तालुक्यातील शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ आज दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी औरंगाबाद हायकोर्टाने सकाळी साडेदहा वाजता बरखास्त केले. पुढील निर्णय होईपर्यंत तेथील कार्यभार अहमदनगरचे प्रधान न्यायाधीश तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही त्रीसदस्य समिती सदरचा कार्यभार सांभाळणार असे न्यायमूर्ती आर. डी.धानुका आणि न्यायमूर्ती एस.जी.मेहरे यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आली. यामध्ये १२ सदस्यांचे नवीन विश्वस्त मंडळांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्षपदी आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी अॕड. जगदीश सावंत यांची निवड झाली होती. यामध्ये ९ सदस्य व १ पदसिद्ध सदस्य यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र न्यायमूर्ती आर.डी.धानुका आणि न्यायमूर्ती एस.जी.मेहरे यांच्या खंडपीठांसमोर आज मंगळवार रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
१६ सप्टेंबर २०२१ रोजी १२ सदस्यांची नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. सदर विश्वस्त मंडळ श्री साईबाबा संस्थान कायदा २००४ विश्वस्त नेमणूक नियम २०१३ आणि उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन न करता अस्तित्वात आली आहे, त्याची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन राज्य शासनाने १७ पैकी १२ सदस्यांची नेमणूक केली. विश्वस्त मंडळ नेमणूक नियमावलीच्या “क” प्रमाणे नेमणूक नसल्याचे याचिकेत मांडण्यात आले होते. या मंडळात आर्थिक व मागास प्रवर्गातील सदस्य नव्हते. तसेच वैद्यकीय अथवा औषधी निर्माण क्षेत्रातील तज्ञ सदस्य देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे आर्थिक व व्यवस्थापन वित्तीय धोरण लेखापरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक सुद्धा करण्यात आली नव्हती. ८ व्यक्तींपैकी ५ तज्ञांची नेमणूक करण्यात आली. या नेमणूक कायद्याला धरून नाहीत. त्यामुळे नव्या विश्वस्त समितीला स्थगिती द्यावी अशी विनंती शिर्डी येथील याचिकेकर्त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात केली होती. त्यावर माननीय औरंगाबाद खंडपीठाने सदर विश्वस्त निवडी मंडळ बरखास्तीचे आदेश केले.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक