आटपाडीतून कामगाराने पळविले पाव किलो सोने!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील नितीन खरात यांच्या दुकानातून २५० ग्रॅम वजनाचा तीन लाख, ७५ हजार रुपये किंमतीचा सुकवण्याकरिता दिलेला सोन्याच्या चैनचा गठ्ठा घेऊन दुकानातून पळत जाऊन शिवाजी पुतळ्यासमोरील उभ्या असलेल्या चार चाकी गाडीतून पलायन केले. याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चैन फॅक्टरी कारागीर नितीन कालिदास खरात (वय ३० वर्षे,रा. आटपाडी जि. सांगली) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथे चैन फॅक्टरी कारागीर नितीन कालिदास खरात यांच्याकडे दोन दिवसापूर्वीपासून बापी संत्रा रा.मेदिनीपूर कोलकत्ता यास २५० ग्रॅम (२५ तोळे) बॉक्स टाईप सोन्याच्या चैनचा सुमारे तीन लाख ७५ हजार रुपये किमतीचा गठ्ठा विश्वासाने दुकानात दिनांक १४ रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुकविण्याकरता दिला. तो सोन्याच्या चैनचा गठ्ठा घेऊन बापी संत्रा हा दुकानातून एक वाजण्याच्या सुमारास पळत जाऊन आटपाडी नगरपंचायतजवळ असलेल्या शिवाजी पुतळ्यासमोर उभी असलेल्या चार चाकी टाटा झेस्ट या गाडीमध्ये बसून दिघंची मार्गाने निघून गेला. अन्य दोघे मानस भंडारे रा. चोबीसपरगना, कोलकत्ता व गोपी रा.कलकत्ता यांनी त्यास मदत केली. अशी फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.