
अंगारकी संकष्टीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भाविकांची गर्दी
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पाली शहर भाविकांनी निघाले न्हाऊन
बल्लाळेश्वर मंदिरात फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई
धम्मशील सावंत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे
अंगारकी संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. गणेशोत्सव असल्याने सर्वत्र भक्तिमय व मंगलमय वातावरण आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर मंगळवार दि.(13) रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविक भक्तगणांनी फुलून निघाले. अंगारकी संकष्टीनिमित्त श्री बल्लाळेश्वराची मूर्ती फुलांनी सजवली होती, सर्वत्र फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. दर्शनासाठी पालीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पाली शहर भाविकांनी न्हाऊन निघाले.
गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा देखिल तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.
संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन केल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक आगळेवेगळे समाधान दिसून येत होते. कोव्हीडचे प्रमाण कमी झाल्याने बल्लाळेश्वर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून निघतो आहे. बल्लाळेश्वर ट्रस्टने कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या होत्या . बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र गद्रे व विश्वस्त मंडळाने सांगितले. पालितील अरुंद रस्त्यामुळे
अंगारकी संकष्टीला वाहनांची वर्दळ दिसुन आली.
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुकिस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने पार्किंगच्या दिशेने वळविण्यात आली होती.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकाच्या सोइसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
जितेंद्र गद्रे अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती