माळशिरस नगर पंचायतीच्या मुख्याधिकारीपदी नितीन गाढवे यांची नियुक्ती

सर्वांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करु -मुख्याधिकारी नितीन गाढवे
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस शहर हे आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील महत्वाचे शहर असुन या शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न करु, असा विश्वास माळशिरस नगर पंचायतीचे नुतन मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी दिला.
माळशिरस नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदी नितीन गाढवे यांची नियुक्ती झाली असुन आज त्यांनी पदभार स्विकारला. त्यानिमित्त नगर पंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक सचिन वावरे, महादेव देशमुख नगर सेवक अजिनाथ वळकुंडे, रघुनाथ चव्हाण, मावळते मुख्याधिकारी माधव खांडेकर, कार्यालयीन अधीक्षक भाग्यश्री बेडगे, कर निरीक्षक विकास पवार, अमोल पवार, नाना चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना नितीन गाढवे म्हणाले, मी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सिंधदूर्ग जिल्हयातील कुडाळ येथे मुख्याधिकारी म्हणुन काम केले आहे. माळशिरस शहराचा विकास करण्यासाठी लोकशाही मार्गाने सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने एक आदर्श शहर निर्माण करू व नागरीकांना अपेक्षीत असे चांगले काम करु.
यावेळी नुतन मुख्याधिकारी नितीन गाढवे यांचा सत्कार उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. महाळुंग नगर पंचायतीमध्ये नियुक्त झालेले मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांचा सत्कार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कर निरीक्षक विकास पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.