मेंढपाळ बांधवांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष सरसावला!
माळशिरस तालुका प्रतिनिधी/ संजय हुलगे :
नातेपुते पोलीस स्टेशन येथे हिंगणगाव ता. फलटण येथील मेंढपाळ आप्पाजी शिवाजी झिटे यांनी गुरसाळे ता. माळशिरस येथील बाळू उर्फ राजाराम भानुदास कोरटकर व शीतल बाळू उर्फ राजाराम कोरटकर या पितापुत्रावर नातेपुते पोलीस स्टेशन येथे मारहाण केले प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे.
आप्पाजी शिवाजी झिटे हे आपल्या परिवारासह काही मेंढपाळ सहकारी यांच्यासोबत शेळ्यामेंढ्या चारत पाच महिन्यापासून उदरनिर्वाह करतात. मेंढ्या चारण्याचा कार्यक्रम सुरू आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासून गुरसाळे हद्दीतील जीनपुरी येथे कॅनलच्या कडेला मोकळ्या जागेत मेंढ्या चारत असताना दुपारी दोन व्यक्ती वय वर्षे 55 ते 60 व 35 ते 40 अशा वयाच्या दोन व्यक्ती शेळ्यामेंढ्या चारत असणाऱ्या ठिकाणी आले.त्यांनी मेंढपाळाला विचारले तुम्ही कोणाला विचारून आमच्या शेतात मेंढ्या चारत आहात?असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत एकाने दगड मारण्यास सुरुवात केली. नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मेंढपाळाचे सहकारी सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. मेंढ्या हाकलत असताना एका इसमाने दगड फेकून मेंढीला मारल्याने मेंढी अंदाजे चार हजार रुपये किमतीची मेंढी मेलेली आहे.सदरच्या दोन्ही व्यक्ती निघून गेल्यानंतर मेंढपाळांनी चौकशी केली असता सदरच्या लोकांची नावे माहित झाल्यानंतर आजूबाजूंच्या लोकांकडून त्यांची नावे बाळू उर्फ राजाराम राम भानुदास कोरटकर व शीतल बाळू उर्फ राजाराम कोरटकर असल्याचे समजले.
त्यांच्यावरती नातेपुते पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1960 कलम 324 ,323,421, 504 ,506 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135 अन्वये नातेपुते पोलीस स्टेशन येथे 24 /7 /2020 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे.नातेपुते पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
मेंढपाळ बांधवाला मारहाण झाल्यामुळे गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरता अमरजीत जानकर, शाहिद मुलानी, माऊली सरक, अक्षयभैय्या भांड ,गणेश काटकर, बाजीराव खताळ, निलेश रुपनवर, सुनील पाटील आदी मंडळी उपस्थित होती. सदरच्या लोकांनी माळशिरस तालुक्यामध्ये कोठेही समाजबांधवावर अन्याय झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असे धनगर समाज संघटना माळशिरस यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेले आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या