आटपाडी दि. 23 (प्रतिनिधी):
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचे वतीने भरारी ग्रुप पुणेचे संस्थापक सुभाष सातपुते यांना राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला असून त्यांचेे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आटपाडी तालूक्यातील राजेवाडी गावचे सुपुत्र व पुण्यामध्ये कार्यरत असलेले सुभाष सातपुते यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून पुण्यामध्ये भरारी ग्रुपच्या माध्यमातून गेली १२ वर्षे विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवुन त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० ने सन्मानीत केले जाणार आहे .
२१ व्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव संमेलनात पुणे येथे १५ सप्टेंबर २०२० रोजी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव होणार आहे .
सुभाष सातपुते यानी महाविद्यालय युवकांना एकत्रित घेवुन १२ जानेवारी २००८ साली जागतिक युवादिनानिमित्त भरारी ग्रुपची स्थापना करून ग्रुपच्या सुमारे ३०० युवक युवतींच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला ” दारु नको दुध प्या अभियान”, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनी झेंडा उचला अभियान, पाणी फाऊंडेशन २०१८–२०१९ साली अन्तर्गत कार्याला पश्चिम महाराष्ट्र मधील सहभागी विविध गावाना १५०० तास स्वतःच्या पोकलेन मशीन मोफत देऊन पाणी चळवळीत योगदान दिले आहें. ग्रामीण भागातील गरीब व गरजू अशा ५०० विध्यार्थ्यांना आजपर्यंत पार्ट टाएम जॉब मिळवून देऊन आधार दिलेला आहे. विशेषत : रक्तदानामध्ये आजपर्यंत त्यांनी मोठे करून शिबीरातून २५०० पिशव्या रक्त संकलित करून दिले आहे.. त्याचबरोबर ५ जून२०१७ साली जागतिक पर्यावरण दिनानिमित सुरु केलेल्या एक युवा बा का महिने बारा झाडे हे अभिनव अभियान पुण्यातील विविध टेकडीवर सुरु केले आहे.या अभियानात १०० युवक एकत्रित आले असुन प्रत्येक महिन्याला एक झाड याप्रमाणे आजपर्यंत ३७०० विविध वृक्षाची लागवड करुन ती जोपासली आहेत.५०००० बीजांचे बीजारोपण केले आहे. ह्या अभिनव अशा अभियानाची दखल पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यानी घेतली असुन या उपक्रमाचे कौतुक करुन त्यानी भरारी ग्रुपच्या कार्याचे कौतुकही केले आहे.या कार्याबदल त्यांना नुकताच त्याना राज्यस्तरीय वसुंधरा पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना काळात रक्तदानाचा तुटवडा निर्माण झाला असता राज्यसरकारने आवाहन केले असता त्वरित रक्तदान शिबिर आयोजीत करुन 303 पिश्व्याचे संकलन देऊन योगदान दिले आहे. लॉकडाऊन काळात अडकलेल्या व गरीब गरजू 1000 कुटुबांना एक महिना पुरेल इतकं जीवनावश्क वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले आहे. 10000 मास्क 2000 लिटर सेनिटाइज़र याचे ही गोर गरीब गरजूना वाटप केले आहे. त्याचबरोबर कोकणात निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या श्रीवर्धन तालुक्यात अनेक कुटुंबांना जीवनावश्क वस्तूंच्या कीटचे वाटप केलेले आहे. या अतुलनीय कार्याची दखल घेवुन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद