माळशिरस तालुका प्रतिनिधी /संजय हुलगे :
सध्या कोरोनाने थैमान घातले असुन माळशिरसमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक पाऊल पुढे टाकून प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात मदत करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी आपुलकी निर्माण झालेली आहे.
माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये बाहेर गावावरून आलेल्या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर वास्तव्यास असणारे माळशिरस शहरातील म्हसवड रोड परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्याच परिसरात आढळून आल्याने त्या परिसरामधील नागरिकांच्या मध्ये घबराट निर्माण झालेली होती. सदरचा परिसर सील केलेला असल्याने त्या परिसरातील नागरिकांना बाहेर पडतात येत नाही अशा वेळेला सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस नगरपंचायत यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने ” लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ” असे न करता स्वयंसेवक म्हणून स्वतः तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, सुरेश वाघमोडे ,श्रीकांत मगर ,संतोष जाधव ,नदीम मुलानी ,अमोल काळे, अजित चव्हाण ,भीमराव गुरव, ओंकार काशीद आदी कार्यकर्त्यांनी समाजसेवा करून अडचणीत असणाऱ्या लोकांना आधार देण्याकरता प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या 96 घरातील कुटुंबांना किराणा, दूध ,मंडई ,औषधे अशा आवश्यक वस्तू पोहोच करून त्यांना सहकार्य करण्याचे काम चालू आहे.
प्रतिबंधक क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध केलेला असल्याने त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू पोहोच करण्याचे स्वयंसेवक काम करीत आहेत ज्या दुकानांमध्ये खरेदी केलेले जीवनावश्यक वस्तू यांची यादी त्यावर असणारे रक्कम एवढेच घेतले जात आहे त्यामुळे ना नफा ना तोटा फक्त समाजसेवा या उद्देशाने माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये अनोखा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविला जात आहे माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ . विश्वनाथ वडजे यांनी स्वयंसेवकांना टी-शर्ट दिलेले असून त्यांनाही नगरपालिका सहकार्य करीत आहे. समाजामध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा परिसराला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदत करीत आहेत त्यामुळे प्रतिबंधक क्षेत्रांमधील नागरिकांची औषधे व अत्यावश्यक असणारे किराणा सामान व भाजीपाला घरपोच होत असल्याने नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद