कुडणूरात सापडला हातबॉम्ब !

शिवाजी ओलेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडणूर गावामध्ये हँड ग्रॅनाईट(हात बॉम्ब )सापडला आहे .सांगलीहून बॉम्ब शोध व बॉम्बनाशक पथक कुडनूर गावात दाखल झाले आहे.
गावचे पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम, उपसरपंच गुलाब पांढरे हे घटनास्थळी उपस्थित आहेत.यांनी ही माहिती दिली. घर मालकाचे नाव सदाशिव व्हनमने आहे. घर गेले दहा वर्षे बंद अवस्थेत आहे. पडक्या घरासमोरील व्हरांड्यात इयत्ता सहावी शाळेचा वर्ग भरत होता. बॉम्ब कसा आला? याबाबत गावकरी अनभिज्ञ आहेत..गावात व सर्व पंचक्रोशीत भितीयुक्त चर्चांना उधाण आले आहे.