प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आटपाडी तर्फे वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समितीचे संस्थापक भा.वा.शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिक्षक समितीचा २२ जुलै हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिक्षकांचे मजबूत संघटन असावे आणि शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेची मुहूर्तमेढ भा.वा. शिंपी गुरुजी यांनी २२ जुलै १९६२ रोजी रोवली. संघटनेमुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली .त्यामुळे शिक्षकांचे सध्याचे जीवनमान समृद्ध झाले आहे,असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय कबीर यांनी स्थापना दिनानिमित्त आटपाडी पंचायत समिती शिक्षण विभागास तालुका शाखेच्या वतीने पाण्याचा जार व वर्षभर पाणी पुरवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. यामुळे प्रशासन व तालुक्यातून विविध कामानिमित्त शिक्षण विभागात भेट देणाऱ्या अनेक शिक्षकांची सोय होणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे ,तानाजी गळवे, शामराव ऐवळे, प्रवीण बाड,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन देठे ,आदर्श शिक्षक अजय राक्षे , आदर्श शिक्षक हैबतराव पावणे ,चंद्रकांत गवळी, रमेश सूर्यवंशी,सतीश मदने, प्रशांत चंदनशिवे ,सलीम मुलाणी, समाधान पारधी, तंत्रस्नेही सत्यवान माने, संजय काळेल, बदडे,प्रशांत हेगडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन