
४६ कामांना ५ कोटींचा निधी मंजूर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी नगरपंचायत जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा – सेना सरकारने आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील वेगवेगळ्या पायाभूत सुविधा विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. युवानायक अनिलशेठ पाटील यांनी याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर व सरकारचे अभिनंदन करून विशेष आभार मानले आहे. पाच कोटी रुपये निधी मंजूर केलेल्या खालील ४६ कामांचा समावेश आहे.
आटपाडीतील आंबेडकर नगर अंतर्गत बंदिस्त गटार करणे 10 लाख रुपये, अंबाबाई मंदिर परिसर तोरणे यांच्या घरापासून बायपास रोड पर्यंत सिमेंट रस्ता करणे 10 लाख रुपये, चौंडेश्वर मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधणे 10 लाख रुपये, रामोशी वाडी येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये, कोष्टी गल्ली अंतर्गत रस्ता करणे 10 लाख रुपये, डवरी समाज दफनभूमी टॉ कंपाऊंड करणे 10 लाख रुपये ,दांडोरमळा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये ,लोणारी मळा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये ,प्रकाशवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे 10लाख रुपये, चौंडेश्वरी कॉलनी येथे अंतर्गत रस्ता करणे 10 लाख रुपये, श्री गणेश क्लिनिंक ते दिलावर खाटीक यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 10 लाख रुपये, सागरमळा नंबर एक येथे अंगणवाडी शाळेच्या पाठीमागे बंदिस्त सभागृह बांधणे- सागरमळा दोन येथील आबा नगर येथे स्मशानभूमी बांधणे याच्यासाठी 15 लाख रुपये, आंबेडकरनगर येथील नागोबा मंदिर ते आंबेनगर मळा पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे 15 लाख रुपये, बायपास रोड ते म्हसोबा मंदिर रस्ता करणे 40 लाख रुपये, रानमळा येथे स्मशानभूमी बांधणे 10 लाख रुपये, शेगदरमळा येथे स्मशानभूमीन व जि प शाळा समोरील लादीकरण करणे 13लाख रुपये, सुतारमळा येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीकरण रस्ता 10 लाख रुपये, खांडेकरवस्ती येथे बंदिस्त सभागृह 10 लाख रुपये, भिवघाट रोड ते गोंदिरापाटील मळा रस्ता करणे 15 लाख रुपये, रामोशीवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे 12 लाख रुपये ,लवटे वस्ती येथे बंदिस्त सभागृह करणे 10 लाख रुपये ,लवटेवस्ती येथे लाधिकरण करणे व लवटे वस्ती येथे स्मशानभूमी बांधणे व गोंदिरामळा येथे पाटील वस्तीवर सभागृह बांधणे 15 लाख व गोंदिरा येथे पाटील वस्तीवर सभागृह बांधणे 15 लाख रुपये, गोंदिरा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये ,शेटफळे रोड ते मरगळे वस्ती पर्यंत रस्ता करणे 30 लाख रुपये, मापटे मळा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10लाख रुपये, मापटे मळा येथे लाधिकरण करणे भिंगेवाडी आटपाडी येथे बंदिस्त सभागृह बांधणे 15 लाख रुपये, भिंगेवाडी आटपाडी येथील स्वतंत्रपुर वसाहत येथे रस्ता करणे 30 लाख रुपये, अनुसेमळा येथे अंतर्गत सीमेटी काँक्रीकरण रस्ता करणे वीस 30 लाख रुपये आटपाडी येथील अनुसे मळा येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीकरण रस्ता करणे 20 लाख रुपये, अनुसेमळा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये, बोराटमळा येथे स्मशानभूमी बांधणे व लादिकरण करणे 10 लाख रुपये ,कोळेकर मळा येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये कोळेकरमळा येथे अंतर्गत रस्ता करणे 10 लाख रुपये, कोळेकरमाळा येथे लादिकरण करणे व पांढरेवाडी येथे बंदिस्त सभागृह बांधणे 10 लाख रुपये , काळामळा येथे जि प शाळा परिसरात पाण्याची टाकी बांधणे 10 लाख रुपये असा एकूण 46 कामांना पाच कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आटपाडी नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर व आटपाडीच्या इतिहासातील पहिल्यांदाच पाच कोटीचा निधी मंजूर झाला असून हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला ताबडतोब यश आले. खऱ्या अर्थाने नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदाच पाच कोटीचा निधी आल्यामुळे सर्व आटपाडीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
“आमदार गोपीचंद पडळकर व सरकारने आटपाडी नगरपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर करून आटपाडीच्या विकासाला चालना दिली आहे. आमदार पडळकर यांनी यासाठी प्रयत्न करून तातडीने हा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आमदार पडळकर व सरकारचे विशेष अभिनंदन !”
-युवानायक अनिलशेठ पाटील,आटपाडी.

बहुजनांचं नेतृत्व आणि आटपाडी तालुक्याचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत आटपाडी शहराच्या विकासासाठी एकून ४६ कामांसाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून आटपाडीच्या विकासाला गती देण्याचे मोठे कार्य त्यांनी यानिमित्ताने पार पाडले आहे.याबद्दल झरे येथील गेस्ट हाऊसवर जाऊन युवानायक अनिलशेठ पाटील यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला.या आनंदाच्या क्षणी त्यांनी आपल्या लाडक्या आमदाराला चक्क उचलून घेऊन आपला आनंद व्यक्त केला.बहुजनांच्यासाठी राज्यभरात मोठ्या ताकदीने लढणाऱ्या आटपाडीच्या या नेतृत्वाचे तमाम आटपाडीकरांच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन