जत येथील श्री बसवेश्वर महाराज मंदिर येथे गंगाजल अभिषेक व पूजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसी श्री विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला, या पवित्र तीर्थक्षेत्राच्या येथे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार यांनी पूजा अभिषेक करून गंगा आरती केली व तेथील गंगाजल राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक तीर्थस्थळाला पाठवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जत येथे श्री बसवेश्वर महाराज मंदिर येथे गंगाजल अभिषेक व पूजन करण्यात आले व जत तालुक्यातील पाण्याचा दुष्काळ संपुष्टात यावा अशी सर्वांनी प्रार्थना केली.
याप्रसंगी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मा. उत्तम चव्हाण, राष्ट्रवादीचे युवा नेते मा. सागर शिनगारे,श्री शरणाप्पा अक्की ,अध्यक्ष श्री बसवेश्वर मंडळ जत, श्री महादेव स्वामी मठाधिश श्री शिवलिंगव्वा मठ जत, श्री शिवकुमार दुगाणी संचालक श्री शिवानुभव संस्था जत, वर्श्रा राजू दुगाणी सर श्री मुना इमारतवाले, श्री किरण बिज्जरगी अध्यक्ष व्यापारी संघटना जत, श्रीमलिकार्जुन मुडशी, श्री चंदकात पोतदार, श्री सुनिल आरळी, जयंत भोसले,अक्षय घाडगे, अनिल सूर्यवंशी ( शिवसेना कार्यकते ), श्री सुबराया चव्हाण ( अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघटना जत ), अनिल देशपाडे(अध्यक्ष ब्राम्हण महासंघ), श्री भिमराव मुडशी, श्री अशोक पोतदार, श्री सुनिल कंगोणी, श्री मल्लिकार्जुन मोगली, श्री सुभाष बेळुबी साहेब, श्री चेतन दुगाणी व श्री नंदकुमार लोणी, सौ. जयश्री कंगोणी, सौ महादेवी मुडशी, सौ .जयश्री स्वामी, श्रीमती सुलोचना हत्ती, श्रीमती शारदा स्वामी, इतर अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.