अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत शहरातील विजापूर- गुहागर या महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकातील खड्डे तत्काळ मुजवा अन्यथा ७ जुलै रोजी रास्ता रोको करण्यात येईल,असा इशारा मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
विजापूर – गुहागर महामार्गावरील जत शहरात सोलनकर चौक बसवेश्वर चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी रस्ता ठेकेदाराने दुभाजक बसवण्यासाठी जागा ठेवली आहे. या रस्त्याचे काम होऊन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवले नाहीत. तसेच दुभाजकच्या जागी फक्त माती टाकली आहे. ही माती पावसामुळे ओली झाल्याने खचल्यामुळे रोज अनेक अपघात होत आहेत. हा रस्ता मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वर्दळ असते. या रस्त्याने अवजड वाहने सुद्धा वेगाने जातात. यामुळे शहरातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सदर या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून विजापूर- गुहागर या मार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी या असलेले खड्डयात तत्काळ दुभाजक बसवावे. या ठिकाणचे खड्डे काँक्रिटने मुजवावेत, अन्यथा विजापूर-गुहागर महामार्ग महाराणा प्रताप चौक ते जत येथे मनसेच्या वतीने रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे या निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी, जत शहर प्रमुख श्रीकृष्ण तळेकर, उपाध्यक्ष शरद चव्हाण, मनोज साळे, संजय वाघमोडे आदि जणांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती