मुचंडी येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील मुचंडी येथे विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.अशोक तेली असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुचंडी येथील अशोक बाबू तेली हे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शेतामध्ये विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अधिक तपास पोलीस आहेत.