प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
करगणी/आटपाडी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आटपाडी तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी मनोहर साळूंखे यांचे पिताश्री भगवानराव साळुंखे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.
अत्यंत कष्टाळू, जिगरबाज, ध्येयवेड्या भगवानराव साळुंखे यांनी गरीबीची भयावह चटके सोसत मुलाबाळांचे संगोपन केले . मुलामुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या भगवानराव साळुंखे यांचे तीन नातू, नात सुना अमेरिका, दुबई येथे मोठ्या पदांवर कार्यरत आहेत . शेतमजूर, शेतकरी असा प्रवास केलेल्या भगवानराव यांना करगणी पंचक्रोशीत सदगुणी, सदाचारी, सोज्वल, शांत, संयमी गुणाचे, ध्येयवेडे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी भगवानराव साळूंखे यांच्या मृताम्यास श्रद्धांजली वाहिली आहे.
उच्च पदस्थ मुलगा, चार शिक्षित मुली, जावई, सुन, नातवंडे, नात सूना, परतवंडे असा मोठा परिवार आहे . वयाच्या ८५ व्या वर्षी निधन पावलेल्या भगवानराव साळुंखे यांच्या तिसऱ्या दिवशीच्या रक्षा विसर्जनाचा धार्मिक विधी उद्या दि .१९ जून रोजी सकाळी ८ वाजता करगणी ओढपात्रातील स्मशानभूमी येथे होणार आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती