बिरनाळ तलाव वर्षातून चार वेळा भरणार!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत शहराच्या नळपाणी योजनेकरिता व पुरवठा शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, तसेच बिरनाळ तलावामध्ये पाणी आरक्षित करण्याबाबत मुंबई येथील मंत्रालयात बैठक झाली. तसेच तालुक्यातील १२ तलावांना म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते. त्यातून २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. याबाबतसुद्धा निर्णय घेण्यात आला.
आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, संबंधित विभागाचे सचिव,अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. म्हैसाळ योजनेतून बिरनाळ तलाव वर्षातून दोन वेळा भरला जात होता. मात्र मुबलक पाण्यासाठी वर्षातून ४ वेळा तलाव भरण्याबाबतचा निर्णय बैठकीत झाला. जत शहरासाठीच्या नवीन नळपाणीपुरवठा योजनेतील कामातील एक महत्वाचा टप्पा आज पार पडला. त्यामुळे शहराच्या वाढीव लोकवस्तीसह संपूर्ण शहरास पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. त्यामुळे जत शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच तालुक्यातील १२ तलावांना म्हैसाळ सिंचनयोजनेचे पाणी जाऊ शकते. त्यातून २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. याही विषयावर बैठकीत चर्चा झाली. या गावांना पाण्याची उपलब्धता होण्यासाठी तलावांची दुरुस्ती करून लवकरच योजनेचे पाणी सोडन्याबाबत नियोजन करण्याचे आदेश मंत्र्यानी दिले.
या बैठकीस जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, जत नगरपरिषद जतचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक