प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून २० जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या २९ जुलै २०२२ रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे :
रायगड,
रत्नागिरी,
सिंधुदुर्ग,
नाशिक,
जळगाव,
अहमदनगर,
पुणे,
सातारा,
सांगली,
सोलापूर,
कोल्हापूर,
औरंगाबाद,
जालना,
परभणी,
हिंगोली,
बीड,
नांदेड,
उस्मानाबाद,
लातूर,
अमरावती,
बुलढाणा,
यवतमाळ,
वर्धा,
चंद्रपूर
गडचिरोली

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक