भारतीयांची जीवन वाहिनी एस.टी.ला मोठे वैभव प्राप्त झाले पाहिजे!

एस.टी.चे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण! मान्यवर,प्रवाशांकडून शुभेच्छा!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

भारतीयांची जीवन वाहिनी एस.टी.ला मोठे वैभव प्राप्त झाले पाहिजे. गत ७४ वर्षात एस.टी.ने कोट्यावधी भारतीयांची अहोरात्र सेवा केली आहे.विद्यार्थी, वृद्ध, अंध,अपंग, माता, भगिनी, ज्येष्ट नागरीक, मराठी माणसांसह समस्त भारतीयांच्या विकासाला चालना देण्याचे काम एस.टी.ने केले आहे.एस.टी.,तिच्या परिवारातील सर्वांचा राज्य आणि केंद्र सरकारने उद्धार करावा, अशा शुभेच्छा, सदिच्छा, सदभावना, बधाई उपस्थित मान्यवर आणि प्रवाशांनी एस. टी.व परिवाराला दिल्या .
एस.टी.च्या सेवेला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल आटपाडी एस.टी.आगाराचे वतीने एस.टी.बस स्थानकावर सदिच्छा कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते .
आटपाडी एस.टी.आगाराचे आगार प्रमुख सदाशिवराव कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट पत्रकार प्रशांत उर्फ आण्णासाहेब भंडारे, वाहतूक निरीक्षक श्रीकांत दळवी, वाहतूक नियंत्रक अजित शिंगाडे, वाहतूक नियंत्रक, नागराज वाघमारे,सुधीर देशपांडे,किरण टकले, ओंकार इनामदार,किरण लांडगे, विजय ताटपूजे, सुधीर इनामदार, विठ्ठल बाड आणि विद्यार्थी ज्येष्ट नागरीक व प्रवाशी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यकम साजरा करण्यात आला. एस. टी . च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेढे आणि साखर वाटून आनंद द्विगुणीत करण्यात आला.